breaking-newsमुंबई
#CoronaVirus: मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरु करणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG_20200412_133134.jpg)
राज्यात तसेच मुंबईवरील करोनाचे संकट वाढत असल्यामुळे आरोग्य सेवा अधिक व्यापक व बळकट करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर दिला आहे. त्याचवेळी फक्त रुग्णालय कर्मचारी व पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल ट्रेन सुरु करण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.