breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईत करोनाची लागण झाल्याने दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना करोनाची लागण झाली होती. या दोघांचीही करोनाशी सुरु असलेली झुंज संपली आहे. या दोघांमध्ये एक शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर दुसरे सायन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या दोघांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर या दोघांची प्राणज्योत मालवली.