breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | मुंबईतील कूपर रुग्णालयात नर्सला मारहाण

मुंबई | मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंता वाढवणारी आहे. आज मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर जमा झालेल्या मजुरांची मोठी गर्दी पाहिल्यावर कोरोना कसा रोखायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मुंबईच्या अंधेरी भागातील कूपर रुग्णालयात मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंधेरीतील कूपर रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेने दुसऱ्या नर्सला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या नर्सचे कपडे फाडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आज दुपारी 2 च्या सुमाराचा हा प्रकार घडला. यावेळी महिलेने नर्सला जबर मारहाण केली आहे. नर्सच्या कानाला फटका बसस्याने तिला ऐकू येत नसल्याची माहिती सांगितली जात आहे. या सर्व प्रकारावर रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button