Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus | बाधित जिल्ह्यांना आपत्तीसाठी ४५ कोटींचा निधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus.jpg)
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतच आहे. देशामध्ये राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटी इतका निधी देण्यास मान्यता दिली आहे. बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावतीसाठी ५ कोटी, औरंगाबादसाठी ५ कोटी, नाशिकसाठी ५ कोटी याप्रमाणे एकूण ४५ कोटीचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.