breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: पेट्रोल पंपांबद्दल महत्वाचा निर्णय, ठराविक वेळेपर्यंत सुरु राहणार पंप

राज्यात करोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि वैद्यकीय अधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र काही भागांमधून सरकारच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे अधिक नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी जनतेशी संवाद साधताना संचारबंदी लागू करण्यात आल्याचं जाहीर केलं. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी सांगितलं आहे.

जीवनावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी यादरम्यान बंद राहणार आहेत. मुंबईतील पेट्रोल डिलर असोसिएशनने पुढील काही दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पेट्रोल डिलर्स असोसिएशनने आज परिपत्रक जारी करत याविषयी माहिती दिली. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले सर्व खबरदारीचे उपाय आम्ही पाळत होतो. मात्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना घरातून कामावर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिस बंदोबस्तामध्ये काही कर्मचाऱ्यांना प्रश्नांना उत्तर द्यावी लागत असून, काही कर्मचाऱ्यांना लाठीमारही सहन करावा लागल्याचं संघटनेचे अध्यक्ष एम. वेंकट राव यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button