breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus | पनवेलमध्ये आणखी 5 जणांना कोरोनाची लागण
नवी मुंबई | पनवेलमध्ये आज 5 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या 5 रुग्णांमध्ये 3 रुग्ण कामोठे, तर खारघर आणि पनवेलमधील प्रत्येकी 1 – 1 रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. बाधित रुग्णांमध्ये दोन सफाई कामगार, एक मुंबईतल्या खासगी कंपनीतील कामगार, तर एका महिलेचा समावेश आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील एका रुग्णाला पनवेलमधील मेडिकल दुकानातून औषधे आणतांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून मेडिकल दुकानातील सर्व कामगारांच्या तपासण्या करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज आढळलेल्या या पाच रुग्णांमुळं पनवेलमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 69 वर गेला असून आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय.