Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत दिवसभरात नव्या ८२ रुग्णांची नोंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11726-1.jpg)
नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची रविवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल ८२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७४ वर पोहोचली. दरम्यान, आज २ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे.