breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत आज आढळले २२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण
नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृतांची संख्याही दररोज वाढत चालली आहे. आज शहरात २२४ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ५ हजार ८५३ झाली आहे. तर, शहरात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याचबरोबर करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या १९४ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला असून शहरात आतापर्यंत ५ हजार ८५३ रुग्णांपैकी तब्बल ३ हजार २९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.