breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: धक्कादायक! मुंबई सेंट्रलमध्ये कोरोनाची लाट, एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबईला जेरीस आणल्याचं दिसत आहे. आता नव्याने मुंबई सेंट्रल येथे कोरोनाची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत एकाच वेळी तब्बल 55 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही संपूर्ण सोसायटी सील करण्यात आलेली आहे. हा संसर्ग सोसायटीली अनेक लोकांपर्यंत पोहचलेला असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाने नवजीवन सोसायटीतील अनेकांचे स्वॅब नमुने घेतले असून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीचे अहवाल आल्यानंतरच नेमका किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे कळणार आहे. प्रशासनाने पूर्ण सोसायटी सील केली आहे. तसेच अनेकांना त्यांच्या घरातच होम क्वारंटाईन केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button