#CoronaVirus: धक्कादायक! कोरोना बाधित रुग्णांना नेण्यासाठी अॅम्बुलन्सच नाही, 12 तासांपासून 5 रुग्ण घरातच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images-1-1.jpeg)
गुहागर: गुहागरमध्ये प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणारी घटना उघडकीस आली आहे. सरकारी अॅम्बुलन्स नादुरुस्त झाली असल्याचे कारण देत कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 5 रुग्णांना घरातच आयसोलेट व्हा असे सांगण्याची वेळ आलीय. गुहागरमध्ये आज सकाळी 5 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरातून कुठेही जाऊ नका, तुम्हाला न्यायला सरकारी अॅम्बुलन्स येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र रात्र झाली तरीही अॅम्बुलन्स आलेली नाही आणि त्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या नातेवाइकांनी धावपळ सुरू केलेली आहे.
मात्र गाडी आज दुरुस्त होणार नाही, उद्या सकाळी होईल असे सांगत तुम्हाला घरातल्या घरी आयसोलेट व्हावे लागेल असे सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 2 रुग्ण हे गुजगरमधील कुंभारवाडीतले आहेत तर उर्वरित 3 जण हे गुहागर मोहल्ला येथे राहत आहेत. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतर कोणालाही संसर्ग होऊ नयेत त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू व्हावेत यासाठी खरंतर कोविड सेंटर तयार करण्यात आलेत मात्र 12 तास उलटून देखील प्रशासनाने काहीच हालचाल न केल्यामुळे गुहागरमधील 5 जणांना मंगळवारची रात्र घरातच काढण्याची वेळ आलेली आहे.