breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus |कोरोनाशी लढताना राजकारण करू नका – शरद पवार

मुंबई | कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र राहुया, कोरोनावर मात करणं हे एकमेव ध्येय असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. सर्वांना सूचना करत आहेत. राज्य सरकार सांगत असलेल्या सूचनांचं, नियमाचं सर्वांनी पालन करावं असं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे. भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button