breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Coronavirus: उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयातील सुविधांचा शुक्रवारी पालिका आयुक्तांनी आढावा घेतला असून येथेही लवकरच विलगीकरण कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली.

कस्तुरबा रुग्णालयात सध्या ७८ खाटा उपलब्ध असून १०० पर्यंत खाटा वाढविण्याची क्षमता आहे. संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय (२०), कुर्ला भाभा (१०), वांद्रे भाभा (१०), राजावाडी (२०), वडाळ्याचे मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय (५०) आणि भायखळा येथील बाबासाहेब मध्य रेल्वे रुग्णालय (३०) अशा एकत्रित २१८ खाटा पालिकेने उपलब्ध केलेल्या आहेत. याशिवाय मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातही १५ खाटा कार्यरत झालेल्या आहेत.

अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाची शुक्रवारी पालिका आयुक्तांनी पाहणी केली. बाधित भागातून आलेल्या ३०० रुग्णांना अलग ठेवण्याची सुविधा येथे केली जाणार आहे.याव्यतिरिक्त ३० खाटांचा विलगीकरण कक्षही तयार केला आहे, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button