breaking-newsमुंबई

#Coronavirus:मुंबईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत. मुंबईत कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

दरम्यान याआधी मुंबई पोलीस दलात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पोलीस कर्मचारी 50 वयापेक्षा जास्त वयाचे होते.

दिवसेंदिवस मुंबई पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत 700 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत चार, पुणे एक आणि सोलापुरातील एक असा समावेश आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button