breaking-newsमुंबई

#CoronaVirus:पश्चिम नौदल कमांड येथे अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा विकसित

मुंबई : मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे वस्तूंचे निर्जंतुकीकरण करता यावं यासाठी ‘ अतिनील स्वच्छता बे’ नावाच्या तंत्रज्ञानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा वापर करून कामगारांचे कव्हर ऑल, उपकरणे, वैयक्तिक साधणे आणि मास्क यांचे निर्जंतुकीकरण करता येणार आहे.

एका मोठया खोलीमध्ये अतिनील किरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिनील किरणांच्या प्रकाश योजनेसाठी अल्युमिनीयम शिट्सचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे. ही सुविधा ज्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करायचे आहे त्यावर अतिनील- सी प्रकाश सोडते. आणि वस्तूंचे निर्जंतुकीकरण करते. या तंत्रज्ञानाचा वापर श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी देखील करण्यात येतो. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल झाल्यानंतर नौदल डॉकयार्डवर मोठया प्रमाणात कामगार कामाला येणार आहेत. यातील एका कामगार अथवा अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली तर भविष्यात मोठे संकट ओढवू शकते. त्यामुळे लॉकडाऊन उठण्याआधीच खबरदारीचा उपाय म्हणून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती नौदलाचे जनसंपर्क अधिकारी मेहूल कर्णिक यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना मेहूल कर्णिक म्हणाले की, सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे सर्व व्यवस्था लॉकडाऊनमुळे ठप्प झाली आहे. आगामी काळात हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्यास सुरुवात होईल. यानंतर नौदलातील कर्मचारी तसेच इतर कामगार मोठया संख्येने डॉकयार्डवर येतील. येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आणि कामगाराची तपासणी याठिकाणी केली जाईल. मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या सामानाचे निर्जंतुकीकरण कसे करायचे याबाबत प्रश्नचिन्ह होते. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाचं प्रकारची सुविधा नौदल स्थानक कारंजा येथे देखील करण्यात आली आहे. या सुविधेव्यतिरिक्त एक औद्योगिक ओव्हन देखील ठेवण्यात आला आहे. जो कमीतकमी 60 अंश सेल्सिअस तापमानात गरम होतो. बहुतांश सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठीचे हे एक योग्य तापमान आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button