#CoronaVirus:नवी मुंबईत दिवसभरात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-75-5.jpg)
नवी मुंबई : नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात नवी मुंबईत 65 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1711 वर पोहोचला आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 52 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासनामध्ये चिेंतेचे वातावरण आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत 799 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी मार्केट आठवडाभर बंद करण्यात आले होते. सात दिवसातनंतर मार्केट उघडल्यानंतरही एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन दिवसात एपीएमसीमध्ये 14 कोरोना रुग्ण आढळले आहे. लागण झालेल्यांमध्ये एपीएमसीचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि काही व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, परप्रांतीय कामगार आणि एपीएमसी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामधून आतापर्यंत 584 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.