breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना दिलासा! सेंट्रमच्या प्रस्तावाला आरबीआयची मंजुरी

मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे अधिग्रहण करून स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्यास सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला आरबीआयने परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांचा पीएमसी बँक टेकओव्हर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पीएमसी बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पीएमसी बँकेचे अधिग्रहण करून स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्याचा प्रस्ताव सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिला होता. याबाबत आरबीआयने घातलेल्या अटी व शर्तींचेही त्यांनी काटेकोर पालन केले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांना ही मान्यता दिली आहे.

त्यांनी ९० दिवस ही बँक चालवल्यानंतर त्यांना स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना मिळणार आहे. पीएमसी बँकेच्या रिझॉल्युशन प्रोसेससाठी वेळ लागण्याची शक्यता आरबीआयने गेल्या मार्चमध्ये व्यक्त केली होती. या बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने त्याला वेळ लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने तिच्या अधिग्रहणासाठी सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला आरबीआयने मान्यता दिली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेचे संचालक मंडळ २ वर्षापूर्वी बरखास्त करून आरबीआयने प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यांची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली होती. गेल्या वर्षीच्या मार्चपर्यंत बँकेकडे १० हजार ७२७.१२ कोटींच्या ठेवी होत्या. तर ३,५१८.८९ कोटींची थकीत कर्जे होती. पीएमसी बँकेचे शेअर कॅपिटल २९२.९४ कोटींचे आहे. २०१९-२० मध्ये बँकेला ६ हजार ८३५ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. बँकेने ८,३८३ कोटींची कर्जे दिली आहेत. त्यापैकी ७० टक्के कर्जे एचडीआयएलला दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button