“मुख्यमंत्री वेळ देत नाहीत”, राजू शेट्टींची शरद पवारांकडे तक्रार
!["Chief Minister does not give time", Raju Shetty's complaint to Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/sharad-pawar.jpeg)
मुंबई |
केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याला देशात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शेतकरी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत. नुकतेच या आंदोलनाला ७ महिने पुर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व इतर नेते उपस्थित होते. यावेळी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी, असा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांना नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.
आज श्रीमती मेधा पाटकर, श्री. राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह धरला. pic.twitter.com/CopvIj6Fq1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 29, 2021
केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला ७ महीने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. या दरम्यान, राष्ट्रपती व्दारा नियुक्त सर्व देशभरातील राज्यपालांना निवेदन देण्यात देण्यात आले. किसान मोर्चाने या मोर्चाला “शेती वाचवा, लोकशाही वाचवा” असे नाव दिले होते.