Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चंद्रचूड यांच्यावर खटला भरला पाहिजे, संजय राऊत यांची मागणी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे संविधानात बसतं का? चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल करायला हवा. ज्या पद्धतीने मोदी हे राज्य चालवतात ते संविधानाच्या विरोधात आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरही राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी संजय राऊतांनी महाराष्ट्रातील आमदार अपात्रेबद्दलच्या निकालावरही भाष्य केले.

“विधानसभा असेल लोकसभा असेल विरोधीपक्षच राहू नये, विरोधी पक्षाला लोकशाहीत, संसदीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विरोधीपक्ष राहू नये. तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधी पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा. त्यांना तुरुंगात टाकावं. विद्यमान मुख्यमंत्र्‍यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थितीत केला.

हेही वाचा –  BJP चे मिशन 2029 : स्वबळावर 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ‘या’ व्यक्तीकडे!

“भाजपमधील सर्व लोक काय धुतलेल्या तांदळाचे आहेत का? ईडी, सीबीआय कधी भाजपच्या घरी गेली हे दाखवावं. उलट ज्यांच्याकडे गेली होती, ते आज मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजतात. ७० हजारांचा सिंचन घोटाळा करणाऱ्यांवर आधी मोदींनी आरोप केला आणि नंतर त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“ज्या पद्धतीने आमदार फोडले, ते सर्व दहाव्या शेड्युलनुसार अपात्र ठरायला हवेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे संविधानात बसतं का? चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल करायला हवा. ज्या पद्धतीने मोदी हे राज्य चालवतात ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधान हा देशाचा आधार आहे. तो आधार मोदींनी उद्धवस्त केलेला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“पंतप्रधान मोदी हे गेल्या ६५ वर्षात भारताला लाभलेले असत्य बोलणारे पतंप्रधान आहेत. आमच्या संविधानाचा सत्यमेव जयते असा नारा आहे. पण गेल्या १० वर्षात असत्यचा विजय करण्याचे काम मोदी काळात झालेले आहे. मोदींचा नवीन संविधानकर्ता हा गौतम अदानी आहे. गौतम अदाणींना विरोध करणारे संविधानद्रोही आहे हे मोदींना सांगायचे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button