breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

युवा परिवर्तनमध्ये एक्सेंचरसोबत प्राईड मंथ साजरा

मुंबई | LGBTQ+ समुदायाला समान अधिकार देण्यासाठी दरवर्षी जून महिना आंतरराष्ट्रीय प्राईड मंथ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी, मुंबईच्या युवा परिवर्तन संस्थेने त्यांच्या वांद्रे लाइव्हलीहुड सेंटरमध्ये ३० जून रोजी एलजीबीटीक्यू+ विद्यार्थ्यांसोबत एक्सेंचर कंपनीच्या सहयोगाने प्राइड मंथ साजरा केला. LGBTQ+ समुदायातील ब्युटीशियन, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस कोर्सचे विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्यासोबत रेनबो संस्थेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितले. गेल्या दोन वर्षांत समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या कार्यक्रमात ब्युटीशियन विद्यार्थ्यांना सौंदर्य उत्पादनेही तसेच टेलरिंग कोर्सच्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी शिलाई मशीनही देण्यात आली.

संस्थेच्या स्वयंसेविका शिल्पा गायकवाड म्हणाल्या, “आम्ही या वर्षी LGBTQ+ समुदायासाठी ब्युटीशियन, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस, टेलरिंग सारखे कोर्सेस सुरू केले आहेत, आम्ही 15 हून अधिक विद्यार्थ्यांना अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली आहे. “या अभ्यासक्रमांद्वारे, आम्ही LGBTQ+ विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन कसे करावे, लोकांशी संवाद साधावा आणि मुलाखतीची तयारी कशी करावी हे शिकवतो.” असेही शिल्पा यांनी सांगितले.

हेही वाचा    –      पीक विम्याबद्दल महत्त्वाची अपडेट, नावात बदल असेल तरी पीक विमा अर्ज स्वीकारणार!

 

 

मुंबईत राहणाऱ्या शहझादला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. त्याने युवा परिवर्तनमधून लॉजिस्टिकचा कोर्स केला. या कोर्समध्ये शहझादने पार्सल हाताळणी, शिपमेंट वर्गवारी करणे आणि शिपमेंट करणे हे शिकले. आज शहजाद ॲमेझॉनमध्ये काम करत असून दर महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतो. “मला LGBTQ+ विद्यार्थ्यांना स्किल ट्रेनिंगसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. १२ वी नंतर कला शाखेत पदवी मिळवायची आहे.” असे शहझादने सांगितले. विघ्नेशने पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले असून तो आता अमेझॉनमध्ये काम करतोय आणि कुटुंबालाही मदत करत आहे. याचसोबत सुजल अधिकारी, विशाल चौधरी हे देखील ॲमेझॉनमध्ये कार्यरत आहेत.

प्राईड मंथ का साजरा केला जातो?

जून महिन्याला प्राइड मंथ म्हणतात. जगभरातील LGBTQ+ समुदाय आणि त्याला पाठिंबा देणारे लोक दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. LGBTQ+ समुदायामध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर आणि इंटरसेक्स लोकांचा समावेश होतो. हा महिना या समुदायातील लोकांसाठी समान ओळख आणि जागरुकता देण्यासाठी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button