ताज्या घडामोडीदेश-विदेशमुंबई

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचं नाव उंचावलं

निदर्शना यांच्या साडीतून अस्सल भारतीय नारीचे सौंदर्य

मुंबई : हॉलिवूडपासून बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचे सर्व प्रसिद्ध सेलिब्रिटी सध्या फ्रान्सच्या कान्स शहरात अवतरले आहेत. अनेक फॅशन डिझायनर्सचे आउटफिट्स यावेळी रेड कार्पेटवर पाहायला मिळत आहेत. वेस्टर्न सोबतच ट्रेडीशनल आउटफिट्सचे सुंदर कलेक्शनही इथे पाहायला मिळत आहे. दरम्यान,यावेळी एका भारतीय महिलेने तिच्या वेशभूषेने आणि शाही साजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कमला मिल्सच्या मालक Nidarshana Gowani यांनी Cannes Film Festival 2024 मध्ये पहिल्यांदाच ‘मेड इन इंडिया’ची ताकद दाखवली आहे.

त्यांच्या साडीसोबतच त्यांचे दागिनेही अतिशय सुंदर डिझाइन केले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की निदर्शना यांनी परिधान केलेल्या नेकपीसचे संपूर्ण जगात फक्त 5 पीस आहेत. त्यांच्या या एकंदर लुककडे पाहिल्यावर असे वाटते की त्या भारताचा वारसा जागतिक उंचीवर घेऊन गेल्या आहेत.

निदर्शना गोवानी यांची सुंदर साडी
बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणेच निदर्शना गोवानी यांनीही भारताच्या वतीने 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हल मध्ये भाग घेतला. आणि, त्या रेड कार्पेटवर अवतरल्या तेव्हा सगळ्यांना त्यांनी थक्क केले. त्यांनी आपल्या पहिल्या अपीरीयन्ससाठी फॅशन ब्रँड गॅविन मिगुएलची पिवळ्या रंगाची साडी निवडली. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचे सादरीकरण करण्यासोबतच ह्या नामांकित परदेशी रंगमंचावर भारतीय कलेचेही सुंदर प्रदर्शन केले. या साडीत निदर्शना खूपच सुंदर दिसत होत्या.

100 पेक्षा जास्त कारागीरांनी विणलेली साडी
कमला मिल्सच्या मालकीण निदर्शना यांच्या या साडीतून अस्सल भारतीय नारीचे सौंदर्य फ्रान्समधील लोकांनी पाहिले. निदर्शनाच्या यांची आउटफिटची खास गोष्ट म्हणजे त्यांची साडी 100 हून अधिक कारागीरांनी उत्तम जरदोजी भरतकामाने विणली आहे. त्यांच्या पिवळ्या ऑर्गेन्झा साडीवर व्हाईट स्टोन्सने केलेले भरतकाम त्यात अधिकच शाईन आणत आहे. त्यांनी व्ही नेकलाइनसह पांढऱ्या ऑर्गेन्झा ब्लाउजसह आपली साडी स्टाइल केली आहे. साडीप्रमाणेच ब्लाउजमध्येही जरदोजी भरतकामाची फुले दिसून येत आहेत.

ज्वेलरी ठरली युनिक
निदर्शना यांच्या आउटफिटसोबतच त्यांची ज्वेलरीही खूप अनोखी होती. घन सिंह यांच्या कलेक्शनमधील 118 वर्ष जुन्या मीना जडाऊ दागिन्यांना परिधान करून त्यांनी स्वत:ला रॉयल टच दिला. निदर्शना यांनी सोबतच शाही साज मिळावा म्हणून कृष्ण गुआ नवरत्न हार घातला होता. ज्यात पोल्का हिरे बसवलेले होते. हा नेकपीस बनवण्यासाठी 200 कारागीर आणि 1800 तास लागले. नेकलेससोबतच निदर्शना यांच्या एका हातात बांगडी आणि दुस-या हातात महागडे घड्याळ आणि मॅचिंग कानातले होते. त्यांचा एकूणच लूक परदेशी भूमीवर भारताचे महत्त्व दर्शवत होता.

कान्स २०२३ ला सुद्धा होती साडीची चर्चा
यावर्षीप्रमाणेच गेल्या वर्षी म्हणजे 2023 च्या कान्स फेस्टिव्हलमध्येही निदर्शना यांचीच चर्चा होती. त्या छोटे छोटे कपडे घालून रेड कार्पेटवर फिरणा-या विदेशी नट्यांमध्ये कायमच वेगळ्या आणि आकर्षक ठरतात. कारण त्या न लाजता प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन भारताच्या संस्कृतीचं प्रदर्शन मांडतात. सुश्री निदर्शना गोवाणी यांनी गेल्या वर्षी हाताने विणलेली सुंदरशी गुलाबी बनारसी साडी नेसून रेड कार्पेटवर येत सर्वांना आश्चर्यचकित केले. भारतीय संस्कृती आणि कलेवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांची खूप प्रशंसा देखील झाली होती. या डार्क गुलाबी साडीवर सोनेरी थ्रेड वर्कने सुंदर पानापानांची डिझाईन रेखाटली होती. पडरही गोल्डन रंगात चमकत असतानाच जांभळ्या ब्रॉड बॉर्डरने सजवला होता.

साधेपणा भावला
किलोभर मेकअप तोंडावर थापून आलेल्या अभिनेत्रींसमोर निदर्शनाचा साधेपणा सर्वांना भावला होता. कोणतीही अति ज्वेलरी तिच्या अंगावर नव्हती. फक्त एक मोत्यांचा लॉंग हार बनारसी साडीवर उठून दिसत होता. एका हातात वॉच आणि अंगठ्या आणि डोक्यावर माथापट्टी इतका साधा लुक होता. मेकअपमध्ये तिने पिंक मरून शेडची लिपस्टिक लावली होती आणि पिंक ब्लशने लुक कम्प्लिट केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button