ब्रेकिंग न्यूज : मुंबईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समधील पूल कोसळला; २१ कामगार जखमी
![Breaking News: Bridge collapses at Bandra-Kurla Complex in Mumbai; 21 workers injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/bandra-kurla-mumbai.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक पूल कोसळला असून त्यामध्ये 21 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.
मुंबईत पहाटेच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १३ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अद्याप या दुर्घटनेत कुणीही मृत्यूमुखी पडलेलं नाही. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. पहाटे अचानक त्याचा काही भाग कोसळल्यामुळे काही मजूर जखमी झाले आहेत.