Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

BJP संघटन पर्व: ‘एक कोटी सदस्य नोंदणी’; मुंबईत भाजपची कार्यशाळा

मिशन सक्रिय सदस्य नोंदणी : 4 फेब्रुवारीला मुंबईत मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

मुंबई : महाराष्ट्रात 1 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपाकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. मजूर,रिक्षा, टॅक्सीचालक, बूट पॉलिश करणारे, फेरीवाले, हमाल, अगदी भाजी विक्रेत्यांपासून आयटीमध्ये काम करणाऱ्या, शिक्षकांपासून इंजिनिअरपर्यंत भाजपने सदस्य नोंद केलेली आहे.

या सदस्य नोंदणीच्या पार्श्वभूमीवर येत्या 4 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे सक्रिय सदस्य नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यशाळेमधून पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, मार्गदर्शक सदस्य नोंदणीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत यासाठी मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  अतिक्रमण कारवाईला विरोध; चिखली-कुदळवाडीतील व्यापारी रस्त्यावर!

भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ४ फेब्रुवारी रोजी दहा वाजता मुंबई येथे सक्रीय सदस्य नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश तसेच प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेसाठी प्रदेश पदाधिकारी, सर्व प्रदेश मोर्चा अध्यक्ष व प्रकोष्ठ संयोजक, सदस्यता नोंदणी अभियान प्रदेश समिती, जिल्हा सक्रीय सदस्य-संयोजक, भाजपाचे मंत्री, सर्व खासदार व सर्व आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, सदस्यता नोंदणी अभियान जिल्हा संयोजक, विभाग संवादक यांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी दिनेश जगताप ( 9920266972 )अनिल दाभोळकर ( 9867331944 / 8850281413) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

लवकरच आम्ही सदस्यतेचा एक कोटीचा टप्पा पूर्ण करणार आहोत. भारतीय जनता पार्टीत सक्रिय सदस्य हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सक्रिय सदस्य बनण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करायची असते. सर्व विषयाची व्यवस्थित माहिती होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

– राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button