breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बिटकॉईनमध्ये मोठी घसरण; डॉगकॉईनचा दर 12 रुपयांवर

 

मुंबई | टीम ऑनलाइन
जगातील टॉप 10 पैकी बहुतांशी क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये मागील 24 तासांत मोठी घसरण झाली आहे. जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. क्रिप्टो एक्सचेंज वजीरएक्सनुसार दुपारपर्यंत बिटकॉईन 3.34 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. बिटकॉईनची किंमत 43,497 डॉलर म्हणजे जवळपास 34,21,503 रुपयांवर ट्रेड करत होता.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला बिटकॉईनच्या किंमतीने 68 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर क्रिप्टोच्या दरात घट झाली. आज, बीएनबी आणि कार्डानो या चलनाच्या दरात मोठी घट झाली. इथरियम हे चलन 2.76 टक्क्यांनी घसरून 3,084.26 डॉलर या दरावर ट्रेड करत होता. बीएनबी 5.11 टक्क्यांनी घसरला आणि 411 डॉलरवर ट्रेड करत होता. कार्डानोमध्ये 5.73 टक्क्यांनी घसरण झाली. या क्रिप्टोचा दर 1.16 डॉलरवर होता. सोलानामध्ये 4.18 टक्के, तेरामध्ये 3.86, एक्सआरपी आणि यूएसडी कॉईन मध्येही घसरण नोंदवण्यात आली आहे. पोलकाडॉट आणि डॉगकॉईनमध्ये घसरण नोंदवण्यात आली. जगातील 12 वी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी डॉगकॉईनमध्ये 5.37 टक्के घसरण झाली असून 12.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याशिवाय, मीम करन्सी शीबा इनूमध्ये 7.75 टक्के घसरण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button