breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दादर मार्केटमध्ये मोठी गर्दी, सर्व निर्बंध धाब्यावर

मुंबई– राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असतानाही मुंबईत ठिकठिकाणी होत असलेली गर्दी पाहून नागरिकांमध्ये कोरोनाचे भयच उरलेले नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडवा अत्यंत साध्या पद्धतीने घरच्या घरीच साजरा करून आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन केले असतानाही मुंबईत दादर फुल मार्केटमध्ये सकाळी तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. सोमवारीही अशीच गर्दी या परिसरात झाली होती. दादरच्या भाजी आणि फुल मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या संख्येने नागरिक बाजारात एकत्र जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसाला किमान १० हजार रुग्ण वाढत आहेत. मात्र राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादले असतानाही नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button