६ वर्षांच्या चिमुरड्यासह बेस्ट चालक पित्याची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
![Best driver with 6-year-old Chimurda commits suicide under running train](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220217-WA0009.jpg)
कल्याण | मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेससमोर आपल्या मुलासह रेल्वेसमोर उडी मारून एका पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला. मात्र सहा वर्षाचा चिमुरडा सुखरूप बचावला आहे. आत्महत्या केलेले मृत पित्याचे नाव प्रमोद आंधळे असून ते बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरीवर कार्यरत होते.
प्रमोद आंधळे हे मुलगा स्वराजसह सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये पोहचले. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर त्यांनी मुलासह उडी मारली. प्रमोद यांनी रेल्वेखाली उडी मारली त्यावेळी त्यांचा मुलगा ट्रकमधून बाहेर पडला मात्र प्रमोद रेल्वेखाली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी स्वराजला बाहेर काढले, तर प्रमोद यांचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात प्रमोद हे पत्नी मुलगा आणि मुलीसह राहत होते. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत.