ताज्या घडामोडीमुंबई

लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा एकदाच तीन महिन्यांचा माहेरचा आहेर भेटणार

मुंबई : लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षा बंधनापूर्वी अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल. पण ज्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला त्यांचे काय? त्यांच्या अर्जांना अजून मंजूरीचा संदेश प्राप्त झालेला नाही. त्या बहिणी चिंतीत आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या लाडक्या बहि‍णींना आता एकदाच तीन महिन्यांचा माहेरचा आहेर भेटणार आहे. या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत. रक्षाबंधना पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या बहि‍णींच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

पुण्यातून दिली महत्वाची माहिती

महायुती सरकारने आज पुण्यातील बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या योजनेवरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकार स्थापन झाल्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हे सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. पण बहीण आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. बहिणीच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे. व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे. बाकी कशाचा नाद करा. पण या विषयात नाद करायचा नाही. आम्ही भाऊ म्हणून समर्थ आहोत.

ही देना बँक, लेना बँक नाही

या राज्यातील सामान्य बहीण भाऊ आणि वरिष्ठ ज्येष्ठांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो. आमचं सरकार तेच करतं. सर्व सामान्यासंसाठी या योजना राबवत असतो. काही लोकं म्हणाले पैसे मिळणार नाही. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर काढून घ्या. पण तुम्हाला सांगतो हे देणारं सरकार आहे. घेणारं नाही. ही देना बँक आहे. लेना बँक नाही.

कधी मिळणार पैसे?

ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

हम दो हमारे दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार. यांना गरीबी काय माहीत. मीही शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझी आई कशी कसरत करायची मला माहीत आहे. माझ्या आई वडिलांनी कसे हाल सहन केले याचा मी साक्षीदार आहे. आम्ही संघर्ष करून आलो. सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो. आम्ही चटके सोसले आहेत, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button