breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न; आठवड्याभरातील दुसरी घटना

मुंबई – पुण्यातील आंबेगावच्या सुभाष जाधव या रहिवाश्याने आज सकाळी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जीटी रुग्णालयात दाखल केले आहे. गावच्या जमिनी व घर बळकवाल्याच्या वादाबाबत जाधव मंत्रालयात दाद मागण्यासाठी आले होते. मात्र त्यांना मंत्रालय आत सोडण्यात न आल्याने रागाच्या भरात त्यांनी किटकनाशक द्रव्याचे मंत्रालयाच्या गार्डन गेट वर प्रशान केले.

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची एका आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात १५ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली होती. घर गहाण पडलेय. मोठी आर्थिक चणचण आहे, त्यामुळे आत्महदनाचा प्रयत्न केल्याची माहिती या शेतकऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर आठ दिवसांच्या आत दुसऱ्यांदा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button