ताज्या घडामोडीमुंबई

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरात चंद्रभागा बसस्थानकाचे लोकार्पण

यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून बस स्थानक निर्माण

मुंबई : एसटी महामंडळाच्या महत्वाकांक्षी अतिभव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि प्रवासी तसेच यात्रेकरू निवासस्थानाचे लोकार्पण आज करण्यात आले. एसटीचे हे पहिलाच अशा प्रकाराचा प्रकल्प असून येथून राज्यातील सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या पंढरपूरातील आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून या चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी निवास इमारतीचे आज भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या यात्रेकरुन निवासात भाविकांची अल्पदरात निवासाची सोय होणार आहे. तसेच 500 एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची देखील व्यवस्था होणार आहे.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंच्या निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये 500 एसटी कर्मचारी तसेच एकाच वेळी सुमारे 1 हजार यात्रेकरुंची निवासाची सोय होणार आहे. एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी 2 सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. राज्यात एसटी महामंडळाचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी एकूण 33 कोटी रुपये खर्च आले आहेत.

काय आहेत सुविधा
या बसस्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, पुरुष आणि महिला तसेच दिव्यांगाकरीता स्वतंत्र विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, आपला दवाखाना, जेनेरिक औषधालय, पार्सल कक्ष, पोलीस मदत केंद्र, वातानुकूलित प्रतीक्षालय, प्रशस्त वाहनतळ, दोन उद्वावाहक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या बस स्थानकावरून राज्यात सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button