वर्ध्यात अपघातानंतर कारचा चुराडा, एक मृतदेह थेट झाडावर जाऊन अडकला; पोलीसही चक्रावले
![After the accident in Wardha, the car crashed, a corpse went straight to the tree and got stuck; The police also circled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Wardha-Accident.jpg)
मुंबई |
वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील चिस्तूर गावालगत शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात तीन युवक जागीच ठार झाले असून एक आश्चार्यकारकरित्या वाचला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी सात वाजता ही मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील नागपूरकडे जात असलेल्या कारच्या (एमएच ३०, पी ३२१४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. त्यात अमित गोयते (३२, बडनेरा), शुभम गारोडे (२५, अमरावती), आशिष माटे (अमरावती) हे जागीच ठार झाले.
मात्र याच कारमध्ये असलेला शुभम भोयर मात्र सुखरूप वाचला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चूराडा झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, एक मृतदेह झाडावर फेकला गेला. तर दुसरा गाडीत अडकला आणि तिसरा मृतदेह गाडीच्या बाजूला पडला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असावा. रस्त्याच्यालगत असलेले पळसाचे मोठे झाड तोडून ही गाडी बाजूला फेकली गेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.