94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
![94th All India Marathi Sahitya Sammelan postponed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/marathi-sahitya-sammelan-abd-2_202011522680.jpg)
मुंबई – कोरोनाचा संसर्ग आणि रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे आगामी 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. आता कोरोना विषाणूची साथ ओसरल्यावर पुढील तारखा जाहीर करणार, असा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून घेण्यात आला आहे. हे साहित्य संमेलन यंदा २६, २७, २८ मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते.
कोरोनामुळे साहित्य संमेलन घ्यायचे की नाही याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अखेर आज मराठवाडा साहित्य परिषदेत मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नाशिक शहरात कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा सामाजिक सोहळ्यांच्या आयोजनास परवानगी नाही. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीदेखील लागू आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे.