26 जानेवारीपासून ‘Mumbai night life’ सुरु…’टीकेला उत्तर देणार नाही’,आदित्य ठाकरेंची ठाम भुमिका…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-92.png)
मुबंई | महाईन्यूज |
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची ‘24 तास मुंबई’ (Mumbai night life)ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगित तत्त्वावर मुंबईत निश्चित केलेल्या ठिकाणी रात्रभर हॉटेल्स, मॉल, थिएटर सुरु ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत (Mumbai night life) येणार आहे.
या प्रस्तावानुसार येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात 24 तास हॉटेल्स, मॉल सुरू राहतील. शिवाय मर्यादित आणि निवासी भाग नसलेल्या परिसरात हॉटेल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/images_1575520453004_main_qimg_5ab1a95ba155cfd2dc46ca664ca098a4.jpeg)
दरम्यान, या निर्णयाबाबत अनेकांनी विरोध दर्शवला असून यामुळे महिलांवरील अत्याचार वाढण्याची शक्याता आहे..त्यामुळे पुन्हा एकदा या निर्णयाचा विचार करावा असं सांगण्यात येतंय..मात्र याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं “मी टीकेल उत्तर देणार नाही. या 27 जानेवारीपासून म्हणजे 26 च्या मध्यरात्री पासून मुंबई 24 तास सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईत 24 तास राहणारी लोक आहेत, रात्री काही घ्यायचं असेल, किंवा काही खायचं असेल तर जाणार कुठे? मॉल आणि मिल कम्पाऊंडमध्ये जिथे रहिवासी परिसर नाही, अशा ठिकाणी सुरु करणार आहोत. 2017 मध्ये असा कायदा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी या 26 जानेवारीपासून आपण करणात आहोत. तो कायदा कुठेच हलवला गेला नाही. यातून महसूल आणि नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल”.
याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकेल. मात्र 2017 मध्येच याचा निर्णय झाला आहे. दुकानं किती वेळ सुरु ठेवायची हे आम्ही कोणाला सांगणार नाही. यासाठी कोणतेही बंधन नसेल, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.