breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
“लालबागच्या राजा’चे १.२३ कोटी भाविकांनी घेतले ऑनलाइन दर्शन
मुंबई – मुंबईतील सर्वात लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गणपती ‘लालबागचा राजा’ चे गुरुवारपर्यंत १.२३ कोटीहून अधिक भक्तांनी ऑनलाइन दर्शन घेतले. तसेच पहिल्या ६ दिवसांत भाविकांनी २ लाखांहून अधिक प्रसादाच्या पाकिटांची ऑर्डरही केली गेली.
कोरोनामुळे यावर्षी मूर्तीची उंची १४ फुटांऐवजी केवळ ४ फूटच ठेवली आहे. लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी आणि अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले की, लाखो श्रद्धाळू रोज लालबागच्या राजाचे ऑनलाइन दर्शन घेत आहेत. तसेच लाडूंचा प्रसादही मागवत आहेत. मागील वर्षी आम्ही गणपतीची स्थापना केली नव्हती. यावेळी आम्ही ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. दरम्यान, यावेळी “लालबाग राजा ‘च्या मंडपात प्रत्यक्ष दर्शनाला बंदी असल्याने तुरळक गर्दी दिसत होती.