‘१४ एप्रिल २०२२ पर्यंत आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करु’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/5.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करुन इंदू मिलवरील स्मारकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. सर्व परवानग्या घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम करण्यात येणार आहे. १४ एप्रिल २०२२ पर्यंत आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करु, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामातील अडचणींबाबत माहिती घेतली. किमान २ वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. याच महिन्यात सर्व परवानग्या घेऊन स्मारकाचे काम सुरु करु. स्मारकासाठी जेवढा निधी लागेल तो उपलब्ध करुन देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.
तसंच, १४ एप्रिल २०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण करु. स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांसाठी खुले करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील अनेक भागात झालेल्या गाटपिटीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसंच कर्जमाफीसंदर्भात उद्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.