breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हॉटेल, मॉल्स २४ तास खुली ठेवण्याचे महिनाभर होणार निरीक्षण

मुंबई | महाईन्यूज

येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, मॉल्स २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कायद्यानेच आस्थापनांना २४ तासांची परवानगी दिल्यामुळे पालिकेच्या वेगळ्या परवानगीची गरज भासणार नाही. मात्र तसे असले तरी कायद्यातील तरतुदींचे यामध्ये पालन होते की नाही याचे निरीक्षण पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागातर्फे केले जाईल. महिनाभर निरीक्षण करून या नव्या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे.

ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार दिवस-रात्र सुरू असतात त्यामुळे दुकानदारांपुढे मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राज्य सरकारनेच आता २४ तास दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा कायद्याद्वारे दिली आहे. मात्र त्यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. चोख सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या मॉल, थिएटर अशा अस्थापनांमधील दुकाने, उपाहारगृहे चालू ठेवता येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button