हा माणूस मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही – नारायण राणे
मुंबई – भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (२६ ऑक्टोबर) काल दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर केलेल्या टीकेला आणि त्यांच्या भाषणाला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केल्याचे नारायण राणेंनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण मुख्यमंत्री आहोत याचे भान तरी ठेवावे. आपण काय बोलतोय याकडे लक्ष असावे. तसेच, मुख्यमंत्री या पदाच्या लायकीचे नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी प्रहार केला आहे.
“मी मुख्यमंत्री असताना अनेक नवे उद्योग आणले. मात्र कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विकासाची कोणतीही घोषणा केली नाही. कोरोना, आर्थिक परिस्थिती यावर काहीही बोलले नाही. मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी, अशा खड़तर शब्दांत मुख्यमंत्र्यांना सुनावले. इतकेच नव्हे, तर ठाकरे बेईमानी करुन मुख्यमंत्री झाले”, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.