“सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला”- न्यायमंत्री धनंजय मुंडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/munde-on-central-go.jpg)
मुंबई | महाईन्यूज
चीनच्या सीमारेषेवर असलेल्या सियाचीन येथे रक्त गोठवणाऱ्या थंडीत तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना पुरशा कपड्यांची आणि अन्नाची कमतरता भासत आहे. द टाईम्स ऑफ इंडियानुसार भारताचे महालेखापाल अर्थात ‘कॅग’ने दावा केला आहे. तर यावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे.
कॅगने दिलेल्या अहवालानुसार सैनिकांना अन्न देखील विपूल प्रमाणात मिळत नाही. त्यावर सुरक्षा मंत्रालयाने सैनिकांना असलेल्या अडचणी लगेच सोडविण्यात येईल, अंस म्हटले आहे. देशाचे रक्षण करत असलेल्या सैनिकांनाच मुलभूत सुविधा मिळाल्या नाही, तर ते देशाचं कस रक्षण करू शकतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात येते आहे. यावर बोलताना मुंडे म्हणाले की, निवडणुकीत मतं मागताना सैनिकांच्या नावाने आपली पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघडा केला आहे. तर सियाचीन, डोकलाम, लदाख या अतिदुर्गम भागात जीव मुठीत धरून देशसेवा करणाऱ्या सैनिकांना ना पुरेसे कपडे आहेत ना मुबलक पोषक आहार. असे म्हणत, सैनिकांच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा मुंडे यांनी निषेध केलेला आहे.