breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सावधान ! केंद्रीय आरोग्य पथकाचा धक्कादायक अंदाज ; मुंबईत १५ मेपर्यंत साडेसहा लाख कोरोनाग्रस्त

मुंबई | मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच केंद्रीय पथकानेही मुंबईची स्थिती पाहाता १५ मे पर्यंत येथील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ५६ हजारांपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबईकरांसाठी ही धोक्याची सूचना असून आतातरी मुंबईकर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा आरोग्य विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनचे शिथिल केलेले नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कठोर लॉकडाऊनचे पालन करावे असे निर्देश दिले. केंद्राचे विशेष पथक बुधवारी सकाळी मुंबईत पाहणी करण्यासाठी दाखल झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या पथकाने धारावीला भेट दिली. पाहणीनंतर पथकाने, मुंबईत ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढतेय, त्या गणिताच्या आधारे ३० एप्रिलपर्यंत मुंबईत ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ५६ हजारांपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button