Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सायरस मिस्त्रींची हकालपट्टी बेकायदेशीर, टाटा व्यवस्थापनाला धक्का
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/cyrus-mistry-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
सायरस मिस्त्री यांची टाटा कंपनीच्या चेअरमन पदावरून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर ठरवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. त्यामुळे टाटा समुहामध्ये सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. रतन टाटा यांच्यानंतर टाटा कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा हाती घेणाऱ्या मिस्त्री यांची तीन वर्षांपूर्वी चेअरमनपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. या विरोधात सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे दाद मागितलेली होती. त्यावर सुनावणी करताना यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिलेला आहे.