breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर…

मुंबई | महाईन्यूज |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे… विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली.

34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. आज प्रकाशित झाली यादी त्यामध्ये 68 गावातील 15 हजार 368 लोकांची नावं आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. 4500 जणांना आधार प्रमाणपत्र दिलं. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत.

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी आज प्राथमिक टप्प्यावर जाहीर झाली आहेत.

अहमदनगर
972 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील 856, तर जखणगाव (ता. नगर) मधील 116 शेतकऱ्यांची नावं या यादीत आहेत. नगर जिल्ह्यात 2 लाख 15 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती आहे.

उस्मानाबाद

तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील 312 शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.

हिंगोली

236 शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे.

कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचं समजतय… कर्जमाफी यादी जाहीर झाल्यांनतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button