शिवसेनेचे तीनवेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे भाजपात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Vijayraj-Shinde-ex-Shiv-Sena-MLA-768x520-1.jpeg)
मुंबई – बुलढाणा मतदारसंघात तीन टर्म शिवसेनेचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. यावेळी माजी मंत्री संजय कुटे, जिल्हा अध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, योगेंद्र गाडे हे उपस्थित होते.
विजयराज शिंदे हे तीन टर्म शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, अर्जूनराव दांडगे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सिंधुताई खेडेकर, श्रीकृष्ण मोरे, कांताबाई राजगुरे, तुकाराम राठोड, पुरुषोत्तम नारखेडे, पुरुषोत्तम लखोटिया, मा. सोफियान भाई, राजेश सुरपाजने, गणेशराव पाटील, संजय नागवंशी, सचिन शेळके, सुनील काटेकर, अशोक किन्हळकर, रहिम शाह, समाधान राऊत या नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आजी, माजी सदस्यांनीदेखील यावेळी भाजपात प्रवेश केला.