शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सापडले पाकिस्तानी क्रेडीट कार्ड
मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीक़डून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्यांच्याकडे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. ईडीला सापडलेल्या पाकिस्तानी कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.
वाचा :–राज्यातील शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
ईडीला सापडलेल्या कार्डवर सिंथिया दाद्रस यांचं नाव आहे. हे कार्ड फेयरमॉन्ट बँक, कॅलिफोर्निया इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती आणि स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.
24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वाचा :-स्थानिक स्वराज्य संस्थांचा महावितरणलाच ‘शॉक’
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग 5 तास चौकशी केली होती. ‘आता पुन्हा EDच्या चौकशीला यावं लागणार नाही. जर काही प्रश्न असतील तर जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी मी तात्काळ दोन तासात हजर होईल. तसंच माझ्या कुटुंबीयांमधील कुणालाही आता चौकशीला बोलवण्याची आवश्यकता नाही. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न-उत्तरे झाली. घोटाळा करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली होती.