शिक्षण खात्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
![Varsha Gaikwad on the committee for the Uttar Pradesh Assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/varsha-gaikvad.jpg)
मुंबई – शिक्षण खात्यात नोकरची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत नोकर भरतीची घोषणा केली आहे.शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरभरती बाबत स्वत: वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ पदांसाठी ही भरती असणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. pic.twitter.com/LgeoIbO7k4
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 29, 2021
वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये माहिती दिली की, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतरांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.