breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शपथविधीच्या दिवशी अजित पवार ‘नॉट रिचेबल’
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाविकासआघाडीच्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या दिवशी मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते स्वगृही परतले मात्र, ते त्यांची नाराजी कायम आहे. अजित पवार हे ऐन शपथविधीच्या दिवशी ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत निश्चित झाले आहे. या पदासाठी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.