व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून टाकू शकतो
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/raj-thakre-crea-vandchitra_201905232521.jpg)
मुंबई – जागतिक व्यंगचित्रकार दिन आज (ता.५) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपल्या कुचल्यांनी आसूड ओढणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दिनाच्या शुभेच्छा देतानाही खोचक टिप्पणी केली.
राज यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हणतात, व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज #जागतिकव्यंगचित्रकारदिन ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका.
राज व्यक्तीमत्व राजकीय असले, तरी त्यांचा मुळ पिंड हा व्यंगचित्रकाराचा आहे. त्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेकांवर आसूड ओढले आहेत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार नसतानाही भाजपविरोधात एकहाती सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. राज यांच्या सभेची दखल देशपातळीवर देखील घेतली गेली. निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता राज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत.