विधानसभेत भाजप आणि शिवसेना आमदार एकमेकांच्या अंगावर धावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/BJP-Shivsena-Congress.jpg)
मुंबई / नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील गोंधळाने झाली आहे. विधानसभेत भाजपा आमदार अभिमन्यू पवार आ़णि शिवसेना संजय गायकवाड एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा भाजपच्या आमदारांनी ‘सामना’तील बॅनर झळकावले. मुख्यमंत्र्यांसोर हे बॅनर नेण्याचा प्रयत्न भाजपा आमदारांनी केला.
भाजपा आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर घेऊन आले. तेव्हा शिवसेना आमदार गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला. यावेळी दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेत आरोप-प्रत्यारोप झाले पण समोरासमोर येऊन अंगावर धावून जाण्याचे प्रकार क्वचितच दिसतात. त्यामुळे विधानसभेचे पावित्र्य जपण्यासाठी अध्यक्ष कडक पाऊले उचलावे लागणार आहेत.