breaking-newsमुंबई
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचिवांना कोरोनाची लागण
मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्याने विधानभवनातील विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना लक्षणे आढळल्यास ते स्वत:ला क्वारंटाईन करणार आहे. यापूर्वीही विधानभवनात 14 जणांना कोरोनाची लागण झाली होती. एकीकडे पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरु असतांना विधानभवनात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसॆंदिवस वाढतच चालला आहे. येत्या 03 ऑगस्ट पासुन पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे.