breaking-newsमुंबई

वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले, जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

ठाणे – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिनी प्लाझ्मा दान केले आहे. मे महिन्यातच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज वयाची ५५ वर्षे पूर्ण केली.

ठाण्यातील ‘ब्लड लाईन’ रक्तपेढीमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मादान केले. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. परांजपे यांनीही काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच व्यक्तींनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन यावेळी आव्हाड यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये, त्याऐवजी कोव्हिड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबवले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button