breaking-newsमुंबई

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर रविवारी, २५ नोव्हेंबर रोजी दुरुस्तीकामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद, हार्बरवर पनवेल ते नेरूळ अप व डाऊन मार्ग आणि नेरूळ, बेलापूर ते खारकोपर अप व डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते गोरेगाव अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

  • कधी- स.११.१५ ते दु. ३.४५
  • कुठे- मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग
  • परिणाम- कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे परळपर्यंत सर्व स्थानकांवर लोकल थांबतील. ब्लॉक दरम्यान धीम्या व जलद मार्गावरील लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील. मुलुंड ते माटुंगा दरम्यान दादर आणि सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाडय़ाही धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिव्यापर्यंतच चालवण्यात येईल. त्यानंतर दिवा स्थानकातूनच ही गाडी सुटणार आहे. ती पकडता यावी, यासाठी दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता विशेष लोकल चालवली जाईल.

हार्बर मार्ग

  • कधी- स. ११.३० ते दु. ४.००
  • कुठे- पनवेल ते नेरूळ अप व डाऊन मार्ग आणि नेरुळ, बेलापूर ते खारकोपर अप व डाऊन मार्ग
  • परिणाम- ब्लॉकवेळी पनवेल, बेलापूर येथून सीएसएमटीपर्यंत सुटणाऱ्या , तसेच नेरूळ ते पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते अंधेरी आणि ठाणे ते पनवेल फेऱ्याही रद्दच राहतील. या फेऱ्या ठाणे ते पनवेल सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० पर्यंत आणि पनवेल ते ठाणे सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ पर्यंत बंदच असणार आहेत. ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ लोकल नियमितपणे धावतील. बेलापूर-सीवूड-खारकोपर मार्गावरील लोकल फेऱ्याही बंदच ठेवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते नेरुळ आणि ठाणे ते नेरूळ विशेष फेऱ्या होतील.

पश्चिम रेल्वे

  • कधी- स.१०.३५ ते दु. ३.३५
  • कुठे- बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर
  • परिणाम- बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. बोरीवली स्थानकातील एक ते चार नंबर फलाटातून लोकल सुटणार नाही.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button