breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रिलायन्स जिओमध्ये अमेरिकन कंपनी सिल्व्हर लेकची 5655 कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई | अमेरिकन कंपनी सिव्हर लेक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5,655.75 कोटीची गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने सोमवारी घोषणा केली. ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये आणि एंटरप्रायजेस व्हॅल्यू 5.15 लाख कोटी रुपयांवर करण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सिल्व्हर लेकची 1.15 टक्के भागीदारी होईल.

एप्रिल महिन्यात दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 43,574 कोटींची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकची 9.99 टक्के भागीदारी झाली आहे. 22 एप्रिलला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फेसबुकने या गुंतवणुकीची घोषणा केली होती. ही भारतातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button