राज्य सरकारने बोकडाच्या कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक
![राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातलंही आम्ही ताब्यात घेऊ- नवाब मलिक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/nawab-malik-22_5.jpg)
मुंबई : कोरोनामुळे गेले २-४ महिने सर्व सण हे अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरे होताना दिसत आहे. अशातच बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी असे आवाहन सरकारने केले होते. दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनंतर बोकडाच्या कुर्बानीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राज्य सरकारने कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत..“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबधीत अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाईन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल,” असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.